फडणवीसांना घड्याळ दाखवलं अन् अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर झाले 'विराजमान'
Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस यांना घट्याळ दाखवून अजित पवार उप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. याची पुण्यात सध्या चर्चा सुरु आहे....थांबा.. हे अजित पवार यांनी जाणूनबूजून केलं नाही... तर फडणवीस यांना दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं होतं.. त्यामुळे ते रवाना झाले.. त्यानंतर अजित पवार उप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची मशाल पेटवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले होते.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. यावेळी उद्घाटन सोहळ्याला नियोजित वेळेपेक्षा जास्त उशीर होत होता, त्यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांना घड्याळ दाखवत इशारा केला.
महाराष्ट्र ओपन एटीपी चॅम्पियनशीप स्पर्धेचं पारितोषिक सहा वाजता होणार आहे. मात्र महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचा शुभारंभ अद्यापही सुरूच आहे. अजित पवार वारंवार घड्याळाकडे बोट दाखवून तेच सूचित करत होते, अशी चर्चा सभागृहात रंगली होती. म्हणूनच स्वागत गीत होताच सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांनी प्रस्तावना झाली, असं सूचित केलं.
तेव्हा अजित पवार क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांच्यावर खडसावले आणि आधी स्पर्धेची मशाल पेटवून शुभारंभ करायला सांगितलं. मग दिवसे यांनी सूत्रसंचालकांना तसं सूचित केले.
मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचे अध्यक्ष अजित पवार खुर्चीवरून उठले आणि या सर्वांनी राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची मशाल पेटवून उद्घाटन केलं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या दौऱ्यासाठी जायचं असल्यानं ते पुढं रवाना झाले. त्यानंतर मात्र अजित पवार हे उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले.
पुण्यात राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची मशाल पेटवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले होते.
विरोधीपक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तशीरपणाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. यावेळी त्यांनी थेट कायम विरोधी बाकावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घड्याळ दाखवत कार्यक्रमासाठी उशीर होत असल्याचं सुचित केलं.
वेळेचे पक्के आणि शिस्तप्रिय नेते अशी विरोधीपक्षनेते अजित पवारांची ओळख आहे. सकाळी 6 वाजताचा कार्यक्रम असो किंवा रात्री 10 वाजताचा कार्यक्रम असो अजित पवार वेळेवर त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांच्या या वक्तशीरपणाची कायम राज्यात चर्चा होते. त्यांचे अनेक दौरेही सकाळी 6 वाजता सुरु झाल्याचं आपण यापूर्वी पाहिलं आहे. त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय आज देवेंद्र फडणवीसांनाही आला.