Navi Mumbai Fire Cylinder blast: नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीचा भडका, दोन जण अडकले
Navi Mumbai Fire News: नवी मुंबईत आणि ठाण्यात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथे आग लागली होती. नवी मुंबईतील कामोठे परिसरात आग लागल्याची घटना.
Continues below advertisement
Navi Mumbai fire
Continues below advertisement
1/10
नवी मुंबईच्या कामोठे येथील सेक्टर 36 मध्ये अंबे श्रध्दा सहकारी सोसायटीत आग लागल्याची घटना घडली आहे.
2/10
सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
3/10
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. सोसायटीमधील सर्व रहिवाशांना इमारती मधून बाहेर काढण्यात आले आहे.
4/10
अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
5/10
दुसऱ्या मजल्यावरील एका घरात दोन जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement
6/10
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
7/10
अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
8/10
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर सोमवारी आग लागली होती.
9/10
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इमारतीमधील सुरक्षारक्षकांनी तातडीने आग विझवण्यासाठीचा स्प्रे वापरल्याने पुढील अनर्थ टळला.
10/10
अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडून कुलिंग ऑपरेशन करुन आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.
Published at : 21 Oct 2025 07:29 AM (IST)