PHOTO : प्रसिद्ध सोमेश्वर धबधब्याचे पाणी प्रदूषित, पाणी गोदापात्रात सोडत असल्याचा नाशिककरांचा आरोप
खळखळून वाहणारा नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिककरांच्या पिढ्यान-पिढ्यांसाठी सहलीचं हक्काचं ठिकाण असणारा हा धबधबा आता फेसाळला आहे
सोमेश्वर धबधबा परिसरातील गंगापूर गाव,आनंदवल्ली शिवारात दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रंचड दुर्गंधी देखील पसरल्याचं समोर आलं आहे.
गोदावरी नदीचे पात्रही फेसाळलेल्या पाण्याने पांढरे झाले आहे.
सोमेश्वर धबधबाच्या वरच्या बाजूस असणारा एसटीपी प्लँट या मलनिस्सारण केंद्रातून गोदावरी नदीमध्ये कोणतीही प्रकिया करून पाणी सोडले जात नसल्याचा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा आरोप आहे.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सन 2019 मध्ये या मलनिस्सारण केंद्राची उभारणी करण्यात आली होती.
भूसंपादन आणि प्रकल्प उभारणीसाठी जवळपास 50 कोटीपर्यंत खर्च करण्यात आला, खाजगी कंपनीच्या माध्यमातून सध्या कामकाज सुरू आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याची कबुली व्यवस्थपणाकडून देण्यात आली आहे.