Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion : अवकाळीचा कांद्याला फटका, कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा (Onion) या पावसामुळं भिजल्यानं बाजार समितीत विकला जात नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी या कांद्यावर चरायला शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहेत.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसामुळं भिजला आहे.
भिजलेल्या कांद्याची सध्या बाजारात विक्री होत नसल्यानं त्या कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अद्यापही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. यामुळं कांद्यासह अन्य पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसामुळं भिजला आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा कांद्याला फटका, बाजारात विक्री होत नसल्यानं कांद्यावर शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ