Photo : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

कांद्याच्या दरात मोठी (Oion Price) घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

onion Farmers aggressive nashik Lasalgaon

1/9
, लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. दुसरीकडे NCCF (National Cooperative Consumers​ Federation) कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत.
2/9
कांद्याच्या निर्यातबंदीवरुन (Onion Export Ban) सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
3/9
विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी (Oion Price) घसरण झाली आहे
4/9
निर्यातबंदीवरुन कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
5/9
लासलगाव बाजार समितात सध्या कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर मिळत आहे. तर कमीत कमी 800 तर जास्तीत जास्त 2304 रुपयांचा भाव मिळत आहे.
6/9
सरकारनं तातडीनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
7/9
लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांकडून लासलगाव बाजार समितात कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत.
8/9
केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्यानं मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याच्या दरात सुरु असलेली घसरण सुरुच आहे.
9/9
NCCF कडून कांदा खरेदी सुरु असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केलीय.
Sponsored Links by Taboola