Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळीचा तडाखा, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, पाहा PHOTOS

Nashik Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवाडी परिसरात गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Continues below advertisement

Nashik Unseasonal Rain

Continues below advertisement
1/10
नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी परिसरात आज सोमवारी (दि. 05) दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली.
2/10
या अनपेक्षित हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
3/10
तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट घेऊन आला आहे.
4/10
पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे.
5/10
तर कांदा बियाण्यालाही मोठा फटका बसला आहे.
Continues below advertisement
6/10
यासोबतच आंबा बागांमधील फळांचे देखील नुकसान झाले आहे.
7/10
शेतकरी आधीच उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावाची अनिश्चितता यामुळे चिंतेत असतात.
8/10
त्यातच निसर्गाच्या या आणखी एका तडाख्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
9/10
प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा.
10/10
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून होत आहे.
Sponsored Links by Taboola