नाशिकमध्ये थरार! उड्डाण पुलावर धावत्या एसटी बसला भीषण आग,क्षणार्धात धुराचे काळे लोट; मोठा अनर्थ टळला

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

Continues below advertisement

Nashik Bus Fire

Continues below advertisement
1/7
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील उड्डाण पुलावर एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी घडली.
2/7
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगाराची ही बस असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बसमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला होता. त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना आधीच सुरक्षित ठिकाणी उतरवण्यात आले होते.
4/7
त्यानंतर ही बस दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत असताना नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील उड्डाण पुलावर अचानक बसच्या मागील भागातून धूर निघू लागला.
5/7
काही क्षणांतच या धुराने आगीचे स्वरूप घेतले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
Continues below advertisement
6/7
आग लागल्याची माहिती मिळताच चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहतूक पोलिसांना व अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
7/7
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
Sponsored Links by Taboola