सावरकर उद्यानाचं नाव बदलणार, 'नमो उद्यानासाठी' निधी वळवला; नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक

सावरकर उद्यानाचं काम वर्षानुवर्षं रखडत असताना अचानक ‘नमो उद्यान’ प्रकल्पासाठी निधी मिळाल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

Continues below advertisement

Nashik

Continues below advertisement
1/5
राज्य सरकारनं प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे या निर्णयावरून वाद पेटला आहे.
2/5
भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे. इथं गेल्या २४ वर्षांपासून सावरकर उद्यानाचे काम रखडलेले असून, जे थोडेफार बांधकाम झाले होते त्याचीही दुरवस्था झाली आहे.
3/5
या पार्श्वभूमीवर आता सरकारनं जाहीर केलेल्या ‘नमो उद्यान’ निधीबाबत ठाकरे गटानं शंका व्यक्त केली आहे. सावरकर उद्यानाचेच नामांतर करून त्याला ‘नमो उद्यान’ बनवण्याचा डाव सरकार आखत आहे, असा संशय व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे.
4/5
सध्या प्रशासनानं या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तरीही, ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आगामी काळात भगूरमध्ये ‘नमो उद्यान विरुद्ध सावरकर उद्यान’ या वादावरून राजकारण तापण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
5/5
स्थानिक नागरिकांमध्येही या विषयावर चर्चा रंगू लागली आहे. सावरकर उद्यानाचं काम वर्षानुवर्षं रखडत असताना अचानक ‘नमो उद्यान’ प्रकल्पासाठी निधी मिळाल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola