Nashik : इगतपुरी ते ठाणे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा...
समृद्धी महामार्गचे (Samrudhhi Highway) पॅकेज-14 एकापेक्षा जास्त कारणांसाठी खास असणार आहे. देशातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदे (Road tunnels) अशी ओळख असणार असून, वाहन चालकांना ब्रिजवर वाहन चालवताना सह्याद्री पर्वतरांगांचे चित्तथरारक रूप अनुभवयास मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे दोन्ही पूल सह्याद्री पर्वत रांगांमधील घनदाट असलेल्या जंगलाच्या परिसरात बांधले गेले आहे.
जवळपास 2019 च्या सुरुवातीला या बोगद्याच्या कामाला सुरवात केल्यानंतर दोन वर्षांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून तर ब्रिज-II चे काम पूर्ण होत वेळेवर पूर्ण झाला आहे.
आता दुसऱ्या टप्प्याचे काम देखील सुरु असून सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या नाशिकमधील (Nashik) पिंपरी सदो आणि ठाण्यातील वाशाळा बुद्रुकला जोडणारे 13.1 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.
सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.
शिवाय इगतपुरी (Igatpuri) तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे सुरवातीला काही वर्षे आम्हाला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. ज्यामुळे आमच्या बोगद्याच्या बांधकामावर परिणाम झाला. तसेच ब्रिज-II च्या कामात अडथळा निर्माण झाला.
त्यामुळे जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा सामना करत सह्याद्रीच्या खोऱ्यात 60 मीटर उंचीवर काम करणे सोपे नव्हते. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रकल्प पूर्ण करण्यात आणि किरकोळ कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे दास दास म्हणाले.