PHOTOS : वाह रे नाशिककर! पूर बघण्यासाठी अख्खा गाडगे महाराज पूल भरला, जिल्हाधिकारी जलज शर्मा ताटकळले, नेमकं काय घडलं?
Nashik Rains : यंदाच्या मोसमातील सर्वाधिक विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.
Continues below advertisement
Nashik Rains
Continues below advertisement
1/10
नाशिक शहरातील पावसाचा जोर काल सायंकाळपासून कमी झाला असला तरीही गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे.
2/10
गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 10,988 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आलाय.
3/10
रविवारी सायंकाळी गोदावरी नदीला पूर आल्यानंतर पाणी दुतोंडया मारुतीच्या माथ्यावरून वाहत होतं. आता पाणी थोडं कमी होऊन छातीपर्यंत आलंय.
4/10
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा स्वतः पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गाडगे महाराज पुलाजवळ आले. पण बघ्यांची गर्दी आणि बेशिस्त पार्किंगमुळे ते तिथंच ताटकळले.
5/10
गाडगे महाराज पुलावर पूर बघायला आलेल्या लोकांनी थेट रस्त्यावर वाहनं लावली. कोणतीही वाहतूक व्यवस्था नसल्याने या पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
Continues below advertisement
6/10
महापालिका आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना बसला.
7/10
पाहणीसाठी आलेले वरिष्ठ अधिकारीच अडकले, यावरून व्यवस्थेचं चित्र स्पष्ट होतं.
8/10
काल सायंकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालाय.
9/10
पण गंगापूर आणि अन्य धरणांतून विसर्ग सुरूच आहे.
10/10
त्यामुळे पूरस्थिती कायम असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
Published at : 29 Sep 2025 12:50 PM (IST)