Nashik Long March : लाल वादळ इगतपुरी तालुक्यात दाखल...
शेतकरी लॉन्ग मार्चने दोन दिवसांत 66 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं असून हा मोर्चा आता इगतपुरी तालुक्यात दाखल झाला आहे.
Nashik Long March :
1/11
तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनावर (Vidhanbhavan) घुमणार असून नाशिकमधून निघालेलं लाल वादळ दोन दिवसांत 66 किलोमीटरचं अंतर कापलं.
2/11
लाल वादळाच्या लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून शेतकरी वर्गाचा हा लॉन्ग मार्च आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात दाखल झालाय.
3/11
मात्र या 66 किलोमीटरच्या अंतरात मोर्चेकऱ्यांचे पाय सुजायला सुरुवात झाली असून मात्र विधानभवनावर धडक देणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
4/11
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकार बदललं, मात्र आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडतो आहे.
5/11
अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. इकडे लाल वादळाने एकत्र येत पुन्हा सरकारला घाम फोडण्यासाठी लॉन्ग मार्चचं आयोजन केले.
6/11
त्यानुसार मागील 48 तासांपासून हजारो शेतकरी लॉन्ग मार्चच्या माध्यमातून पायी चालत आहेत. दिंडोरी (dindori) येथून निघालेला पायी लॉन्ग मार्च काल शहरातील जवळील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मुक्कामांनंतर नाशिक शहरातून पुढे निघाला.
7/11
आता हा मोर्चा घोटी शहरानजीक असून आतापर्यंत या मोर्चाने जवळपास 66 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.
8/11
पायी लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून नाशिकनंतर (Nashik) घोटी परिसरात हा मोर्चा विसावणार असल्याचे समजते.
9/11
मात्र या दोन दिवसांच्या प्रवासानंतर अनवाणी पाय सुजू लागले आहेत, बोलू लागले आहेत. मात्र प्रश्न सुटले पाहिजेत ही आस घेऊन शेतकरी कष्टकरी वर्ग पायी चालत आहे.
10/11
आजपर्यंत सरकार कुणाचंही असले तरीही सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे.
11/11
म्हणून भर उन्हात, रस्त्यावरील डांबर तुडवत हे लाल वादळ उन्हात राबणाऱ्या पायांमुळे विधानभवनावर झेपावत आहे.
Published at : 14 Mar 2023 05:29 PM (IST)