PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?

Nashik District Court Building Inauguration : नाशिक जिल्हा न्यायालयाची सात मजली नवीन इमारत महाराष्ट्रातील न्यायालयीन इमारतीत सर्वात देखणी आणि आधुनिक वास्तू ठरणार आहे.

Continues below advertisement

Nashik District Court Building Inauguration

Continues below advertisement
1/10
जवळपास 310 कोटी रुपये खर्च करून उभारलेली नाशिक जिल्हा न्यायालयाची सात मजली नवीन इमारत महाराष्ट्रातील न्यायालयीन इमारतीत सर्वात देखणी आणि आधुनिक वास्तू ठरणार आहे.
2/10
एकाही जिल्हा न्यायालयात नसलेले 'एस्केलेटर' येथे आहे. इमारतीत 45 न्यायालये, सरकारी अभियोक्ता कक्ष, ग्रंथालय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पक्षकारांना बसण्यासाठी विस्तृत जागा, हिरकणी कक्ष आदी व्यवस्था आहे.
3/10
सुमारे चार लाख चौरस फुटाचे बांधकाम असणारी ही पर्यावरणस्नेही इमारत उभारणीत अद्ययावत सोयी सुविधांकडे बारकाईने लक्ष दिले गेले.
4/10
सध्याच्या नाशिक न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या पाठीमागील बाजूला ही इमारत आहे. यामुळे न्यायालयाच्या भव्य दिव्यतेचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
5/10
मागील बाजूला अद्ययावत पर्यावरणस्नेही इमारत आणि पुढील बाजूला वारसा वास्तू यांचा संगम पहायला मिळतो. इमारतीत भ्रमंती करताना विलक्षण अनुभूती मिळते.
Continues below advertisement
6/10
विविध प्रकारची शिल्पे, चित्र आणि वारली चित्रकलेचे दर्शन घडते. त्याच्याशी अनुरुप प्रकाश योजनेची सांगड घालली गेल्याने अंतर्गत भागास वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.
7/10
इमारतीत 45 न्यायालयीन सभागृह आहेत. याव्यतिरिक्त न्यायालयीन कार्यालय, दिवाणी तुरुंग, सरकारी अभियोक्ता कक्ष, ग्रंथालय, संगणक सर्व्हर कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खोली, हिरकणी कक्ष, बँक एटीएम, टपाल कार्यालय आदींचा समावेश आहे.
8/10
इमारतीत वातानुकूलीत यंत्रणा, फर्निचर, अपंगासाठी रॅम्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, छतावर सौर उर्जेसाठी यंत्रणा आदींचा अंतर्भाव आहे.
9/10
पक्षकारांना बसण्यासाठी मोकळी जागा, वकिलांसाठी संयुक्त सभागृहाचाही समावेश आहे.
10/10
शनिवारी सकाळी जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
Sponsored Links by Taboola