डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

Manoj jarange patil malegoan dongrale

Continues below advertisement
1/8
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
2/8
गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने 16 नोव्हेंबर रोजी या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
3/8
घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. या घटनेनं राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून पीडित कुटुंबीयास धीर देण्यासाठी नेते मंडळीही त्यांची भेट आहेत.
4/8
आमदार चित्रा वाघ यांनी बुधवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन आरोपीला फीशीची शिक्षा होण्यासाठी सरकार कठोर पाऊल उचलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर, आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं.
5/8
डोंगराळे येथील पीडित कुटूबियांची मनोज जरांगे पाटील यांनी घेतली भेट, यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी जरांगे पाटील यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी सर्वांनाच गहिवरुन आलं होतं.
Continues below advertisement
6/8
नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी नातेवाईकांची जरांगे पाटील यांच्याकडे केली. तसेच, त्याला छत्रपती चौकात मारा, असेही नातेवाईकांनी म्हटलं.
7/8
जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच अशा आरोपीला फाशीची शिक्षा देण्याऐवजी त्याचा एन्काऊंटर करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली
8/8
दरम्यान, डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत मालेगाव शहरात आज रास्ता रोको करण्यात आला. न्यायालयाच्या आवाराबाहेरील रस्त्यावर नागरिकांनी ठिय्या मांडला होता.
Sponsored Links by Taboola