Devendra Fadnavis : पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं घालून मुख्यमंत्री त्र्यंबकराजाच्या दरबारी, फडणवीसांचा खास लूक पाहिलात का?

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिवळ्या रंगांचे सोवळं अन् उपरणं परिधान केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लुकची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
तसेच, नाशिकमध्ये काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देण्याची शक्यता आहे.