Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
Sarangkheda Horse Market: गुजरातमधून आलेला ‘ब्रम्होस’ नावाचा रुबाबदार घोडा तब्बल 15 कोटी रुपयांचा असल्याची चर्चा बाजारभर पसरली असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
Continues below advertisement
Sarangkheda Horse Market
Continues below advertisement
1/10
सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये गुजरातमधून आलेला ‘ब्रम्होस’ हा घोडा अवतरताच बाजारभर प्रचंड गर्दी उसळली.
2/10
या घोड्याची किंमत तब्बल 15 कोटी रुपये असल्याची चर्चा असून, यामुळे तो देशातील सर्वात महाग घोड्यांपैकी एक मानला जातो.
3/10
ब्रम्होस हा मारवाडी जातीचा, काळ्या रंगाचा आणि कपाळावर आकर्षक पांढऱ्या पट्ट्याचा अत्यंत राजेशाही ठेवणीचा अश्व आहे.
4/10
गुजरातचे नागेश देसाई यांच्या ‘देसाई स्टडफॉर्म’वर या घोड्याचे लहानपणापासून प्रीमियम पद्धतीने संगोपन करण्यात आले आहे.
5/10
पुष्कर बाजारात या घोड्यासाठी 8 कोटींची बोली लागली होती, तरीही देसाई कुटुंबाने ब्रम्होस विक्रीला नकार दिला.
Continues below advertisement
6/10
36 महिन्यांचा आणि तब्बल 63 इंच उंच असलेला ‘ब्रम्होस’ सध्या देशातील टॉप परफॉर्मन्स घोड्यांमध्ये गणला जातो.
7/10
ब्रम्होसच्या देखभालीत दररोज 15 लिटर दूध, पौष्टिक खाद्य, मसाज आणि ग्रुमिंगसाठी स्वतंत्र मजूर अशा विशेष सोयी आहेत.
8/10
देशभरातील अनेक अश्व स्पर्धांमध्ये ‘ब्रम्होस’ने नंबर वन घोडा म्हणून आपली छाप सोडली आहे.
9/10
देसाई स्टडफॉर्मवर ब्रम्होसच्या ब्लिडिंगमधून आतापर्यंत 10 पिल्ले तयार झाली असून, या पिल्लांवर लाखोंच्या बोली लागल्या आहेत.
10/10
ब्रम्होसच्या अपार लोकप्रियता, किंमत आणि राजेशाही थाटामुळे यंदाच्या सारंगखेडा घोडेबाजाराचे संपूर्ण आकर्षण याच घोड्याभोवती केंद्रित झाले आहे.
Published at : 12 Dec 2025 08:36 AM (IST)