सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा

जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडेबाजाराला सुरुवात झाली असून घोडेबाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे.

Continues below advertisement

Sarangkheda Hours market aditya kul

Continues below advertisement
1/8
जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडेबाजाराला सुरुवात झाली असून घोडेबाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे.
2/8
येथील बाजारात पहिल्याच दिवशी 11 लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाली असून पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी अकरा लाखाची गुढी खरेदी केली.
3/8
विशेष म्हणजे येथील घोडेबाजारात 25 हजारांपासून ते 10 कोटी रुपयांपर्यंत घोडे विक्रीसाठी येत असतात, विशेष म्हणजे येथे घोड्यांच्या देखरेखीसाठी मंडपही उभारण्यात आले आहेत.
4/8
देशातील सर्वात मोठा घोडेबाजार अशीही याची ओळख असून काठेवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातीचे घोडे येथे विक्रीसाठी येतात. आदित्य कुल यांनी पांढऱ्या रंगाचा 21 महिन्यांचा घोडा खरेदी केला आहे.
5/8
नंदूरबारच्या सारंगखेडा येथील घोडेबाजारात देशात प्रसिद्ध असून प्रचंड तेजी दिसून येत आहे. यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत. देशभरातून येथे घोडे खरेदी आणि विक्रीसाठी येतात
Continues below advertisement
6/8
येथील घोडेबाजारात पाच दिवसांत साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे.
7/8
अश्व सौंदर्य स्पर्धेचं देखील आयोजन सारंगखेडा येथे करण्यात येत असून त्यादृष्टीने आयोजकांकडून तयारी सुरू असल्याचं जयकुमार रावल यांनी सांगितलं.
8/8
दरम्यान, उंच पुरे, काळ्या, पांढऱ्या रंगाचे रुबाबदार, दिमाखदार घोडे येथे पाहायला मिळतात, हे घोडे पाहण्यासाठी देखील येथे नागरिक गर्दी करतात
Sponsored Links by Taboola