Nandurbar Accident: अस्तंबा यात्रेवरून माघारी परतताना अपघात; चालकाचं पिकअपवरील नियंत्रण सुटलं अन्..., सहा जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
Nandurbar Road Accident: नंदूरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज (शनिवारी) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement
Nandurbar Road Accident
Continues below advertisement
1/11
नंदूरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज (शनिवारी) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/11
काही जणांची प्रकृती गंभीर आहे,त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील चांदशैली घाटात पिकअप गाडी उलटून हा अपघात झाला.
3/11
या गाडीतील प्रवासी हे अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला.
4/11
चांदशैली घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला.
5/11
प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement
6/11
तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
7/11
त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.
8/11
या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.
9/11
पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. त्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले. अनेकांना जबर मार लागला.
10/11
त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस बचाकार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते.
11/11
यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
Published at : 18 Oct 2025 12:31 PM (IST)