Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar News : सनई -संबळाचा ठेका, हलगीचा नाद, नंदुरबारमध्ये तरुणाई थिरकली तीन पावलीवर, खासदार हिना गावितांचे लेझीम नृत्य
नंदुरबार शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून मानाच्या गणपतीचा रथ विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त विसर्जन मार्गावर उपस्थित आहेत. पारंपारिक वाद्याच्या तालावर तरुणाई लेझीम नृत्यावर थिरकली.
याचबरोबर खासदार हिना गावित यांनी मिरवणुकीत सहभागी होत तरुणींसोबत लेझीम नृत्याचा आनंद घेतला.
पहिल्या मानाचा गणपती असलेल्या दादा गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे.
मानाच्या पहिल्या दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 217 सार्वजनिक गणेश मंडळाचे तर अनेक खाजगी गणेश मंडळाच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे.
लेझीम नृत्याचा आनंद घेत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत तरुणाई बेभान होऊन थिरकल्याचे पाहायला मिळाले.
मानाच्या दादा गणपती समोर शहरातील तरुणी लेझीम नृत्यामध्ये खासदार हिना गावित ही सहभागी झाल्या होत्या.
डीजेला फाटा देत पारंपरिक असलेल्या सनई-संबळ, हलगीच्या तालावर गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न होत आहे.
यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला जात आहे.