Nandurbar: नर्मदा काठावरील तरंगता दवाखाना धोकादायक स्थितीत, कर्मचाऱ्यांची आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी धडपड
सरदार सरोवरच्या निर्मितीनंतर नर्मदा काठावरील दुर्गम भागातील गावांना आरोग्य सुविधा देण्यासाठी अनेक अडचणी येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे या भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी तरंगत्या दवाखान्यांची गरज ओळखून युरोपियन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने या ठिकाणी दिले.
गेल्या सतरा वर्षात तरंगता दवाखाना धोकादायक झाला आहे
जीवघेण्या आणि धोकादायक तरंगत्या दवाखान्यातून तुटपुंज्या सुविधा असताना देखील आरोग्य व्यवस्था आपल्या काम चोख बजावत आहे.
प्रतिकूल परिस्थितीत नर्मदा काठावरील बांधवांना सुविधा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.
2005 मध्ये युरोपीयन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने जिल्हातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले. आता हे तरंगते दवाखाने आता अंतिम घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
गेल्या सतरा वर्षात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे
image 8
यातील एक दवाखाना तर 2015 मध्येच बुडाला असून त्याला बाहेर काढण्याची तसदी देखील प्रशासनाने घेतली नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील बिकट झाली आहे.
माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षा या तरंगत्या दवाखान्याची तपासणी करुन त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सादर केला.