PHOTO : निसर्गाची किमया...बारमाही फळे येणारे आंब्याचे झाड
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील पानबारा गावात महामार्गालगत असलेल्या शेतात एका आंब्याच्या झाडाला बाराही महिने आंबे येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपानबारा गावातील शेत मालक सुरेश गावित यांच्या आईने आपल्या घराजवळील कलमी आंबाची बी 90 च्या दशकात शेतात रोप लावले होते.
आज त्या झाडाला बाराही महिने आंबे येत आहेत.
1990 साली हे झाड लावण्यात आलं होतं. 2016 सालापासून बाराही महिने आंबे यायला लागले.
शेतातील मालक या आंब्यांची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करत असतो तसेच नातेवाईकांना देखील आंबे खाण्यासाठी देत असतो.
या आंब्याला बारा महिने आंबे का येतात असा प्रश्न विचारला जात होता.
यासंदर्भात नवापूर तालुका कृषी अधिकारी बापू गावित यांनी सांगितले की आंब्याच्या वृक्षाला जमिनीतून आवश्यक अन्न घटक मिळत असल्याने तेथील वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडाला बाराही महिने फळे येऊ शकतात.