Agriculture News : नांदेडमध्ये पिवळ्या टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग, 15 गुंठ्यात तीन लाखांचं उत्पन्न
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बारड (Barad) येथील गुलाब सखाराम देशमुख या शेतकऱ्याने यावर्षी प्रथमतःच पिवळ्या रंगाच्या टरबुजाची (yellow watermelon) लागवड केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुलाब देशमुख यांनी 15 गुंठ्यात तब्बल 15 टनांचे उत्पादन काढले आहे. या टरबूज विक्रीतून त्यांनी तीन लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतलं आहे.
गुलाब देशमुख यांनी कमी खर्चात चांगले उत्पादन घेतलं आहे. नियोजनपूर्वक शेती करत कष्टाच्या घामाला दाम मिळतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
ग्राहकांच्या गर्दीने गुलाब देशमुख यांच्या पिवळ्या टरबूजाचा गोडवा अधिक वाढला आहे. गुलाब सखाराम देशमुख गेली वीस वर्षापासून प्रत्यक्षपणे शेती करत आहेत.
केळी, हळद, टरबूज, खरबूज अशी नगदी पिके घेण्याकडे त्यांचा कल राहिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून टरबूज आणि खरबूज या पिकांची सातत्याने ते लागवड करतात.
कोरोनासारख्या भीषण काळातही त्यांनी टरबूज आणि खरबूज फळांची लागवड केली होती. उत्पादन तर चांगले होते परंतू लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीमुळं खर्चही पदरी पडला नाही.
टरबूज आणि खरबूज लागवडीतून त्यातही गारपिटीच्या तडाख्यातून वाचल्याने चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बऱ्यापैकी उत्पन्न त्यांच्या हाती लागले आहे.
अवघ्या 100 दिवसांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न जरी पदरी पडले असले तरी यामागे मोठे व्यवस्थापन असल्याचे दिसून येते.