Nanded: शौच खड्ड्याचं पाणी विहिरीत, नांदेडमध्ये पाणीटंचाईत नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर, नागरिक वैतागले
Nanded Water Crisis: राज्यात आता पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून नांदेडमधील चिंचोळा गावातील विहिरीत शौच खड्ड्यातील पाणी गेल्याने नागरिक वैतागले आहेत.
Nanded
1/8
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
2/8
भोकर तालुक्यातील चिंचाळा गावातील गावकऱ्यांना एकच विहीर असल्यामुळे मोठा संघर्ष करावा लागतोय
3/8
प्रशासनाने एका बोरवेलचे अधिग्रहण केले आहे. मात्र बोरवेल मालक पाणी विक्री करतात. आणि नंतर विहिरीत पाणी सोडतात असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
4/8
शौच खड्ड्यातील दूषित पाणी विहिरीत उतरत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
5/8
गावातल्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.
6/8
ग्राम सेविका ,न तलाठी ,न तहसीलदार कुठलाही अधिकारी गावात यायला तयार नाही अशी ओरड सध्या सुरू आहे.
7/8
गावातील महिलांसह लहान मुलेही पाणी शेंदण्यासाठी विहिरीवर जात आहेत.
8/8
गावात एकच विहिर असल्याने नागरिकांना पाणी भरण्यासाठी ताटकळावे लागत असून विहिरीत आता पाणी तळाला गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Published at : 20 Apr 2025 08:35 PM (IST)