Nanded: बायको नांदायला येत नसल्याने नवरोबाचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, नांदेडच्या शोभानगर भागातील प्रकार
नांदेडच्या शोभानगर भागात हा प्रकार घडलाय. देविदास सीबीया असे तीस वर्षीय तरूणाचे नाव आहे.
Nanded news
1/9
बायको नांदायला येत नसल्याच्या कारणामुळे एकाने टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले
2/9
नांदेडच्या शोभानगर भागात हा प्रकार घडलाय. देविदास सीबीया असे तीस वर्षीय तरूणाचे नाव आहे.
3/9
तरुणाने माहेरी गेलेली पत्नी आणि मुलांना परत आणण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला
4/9
दरम्यान, सकाळी सात वाजल्यापासून हा तरूण टाकीवरच बसून होता.
5/9
दरम्यान सकाळपासून सदर तरुण 100 फूट उंचीच्या या जलकुंभावर चढून पत्नी व मुलांना बोलावण्याची मागणी करत होता
6/9
तरूणाच्या बचावासाठी पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते, तरीही सदर तरुण काही खाली येण्यास तयार नव्हता.
7/9
पोलिसांनी आणि नातेवाईकांनी विनंती करूनही तरुण खाली येत नव्हता. जो पर्यंत बायको आणि मूल घरी येणार नाहीत तो पर्यंत आपण खाली येणार नाही.
8/9
बायको माहेरी परत न आल्यास आपण वरून उडी मारून आत्महत्या करू अशी धमकी तो देत होता.
9/9
दरम्यान पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने जलकुंभावरून खाली उतरवले आहे.
Published at : 20 Jan 2023 03:39 PM (IST)