Nanded Sahastrakund Waterfall : सहस्त्रकुंड धबधब्याचा रौद्र अवतार, तर ओसंडून वाहणारा शेख फरीदबाबा धबधबा...
नांदेड जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक धबधब्याचे प्रवाह खंडित झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे
हे धबधबे पुन्हा फेसाळत कोसळतानाचे चित्र आता पाहण्यास मिळतंय.
नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहुर तालुका म्हटलं की,
पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर,आई रेणुका मातेचे मंदिर,
गोंड राजांनी बांधलेली रामगड किल्ला, प्रभू दत्तात्रयाचे निद्रास्थान परिसर, घनदाट हिरवेगार जंगल असे चित्र डोळ्या समोर येते.दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहत असून किनवट तालुक्यातील इस्लापुर येथील ऐतिहासिक सहस्त्रकुंड धबधबा वाहतोय
माहूर येथील फरीदबाबा धबधबा पुन्हा एकदा फेसाळत खळखळून वाहतोय.
दरम्यान फेसाळत वाहणाऱ्या धबधब्याचे हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडनारे आहे.
दरम्यान हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचाही ओघ या पर्यटन स्थळांकडे वाढला आहे.