Nanded Rains: सहस्त्रकुंड धबधब्याचं 24 वर्षांनंतर विशाल रूप; नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार, PHOTO

Nanded Rains: नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झालाय. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला.

Nanded Rains

1/6
Nanded Rains: नांदेड जिल्ह्यात सतत तीन दिवसापासुन पाऊस सुरू आहे. तसचं इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने पैनगंगा नदी पूर आला. त्यामुळे नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याचे विशाल रूप आलं.
2/6
सहस्त्रकुंड धबधब्याचे या अजस्त्र रुपामुळे पाहण्यासाठी पर्यटका गर्दी करत आहेत.
3/6
सहस्त्रकुंड धबधब्याचे असे विशाल रूप 2006 साली झालेल्या महापुरात पहायला मिळाले होते. त्यानंतर आता 24 वर्षांनंतर हे दृश्य पहायला मिळत आहे.
4/6
नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु झालाय. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला.
5/6
भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
6/6
पूरात अडकलेल्यांना एसडीआरएफरच्या टीमने बाहेर काढलंय, यावेळी बाहेर आलेल्या महिलांनी आक्रोश केलाय. इतर गावातही अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. दरम्यान हसनाळ आणि रावणगाव इथे काही लोक अडकले आहेत. तर दुसरीकडे इटग्याळ येथे अडकलेली कारला बाहेर काढण्यात आली.
Sponsored Links by Taboola