Nanded Rain Updates: नांदेडमध्ये पाणीच पाणी! सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय; पाहा फोटो
नांदेडमधील मराठवाडा विदर्भ सीमेवर पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत असून धबधबा पाहण्यासाठी पावसात पर्यटकांनी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिक मोठी गर्दी करत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात धबधबा पहिल्यांदाच ओसंडून वाहत आहे.
नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पावसाने थैमान घातलंय, तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव फुटला असून, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
तर हिमायतनगर तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटून पिकांसह माती खरडून गेली आहे.
तर हिमायतनगर तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताती बांध फुटून पिकांसह माती खरडून गेली आहे.
शेतात अजूनही पाणी तुंबलेले असून, खरीप पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.