Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा; पाहा फोटो
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी देखील काही ठिकाणी पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यात, किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्ट झाली असून, परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आला.
त्यामुळे या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणीअतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणी देखील जोरात झाली.
मात्र, पुढे पावसाने दडी मारल्याने पिकं धोक्यात आली. जुलै महिन्याचे शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिना आतापर्यंत पूर्णपणे कोरडा गेला होता.
मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नांदेड जिल्ह्यात 24 तासांमध्ये सरासरी 32 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
नांदेड किनवट तालुक्यामध्ये एकूण सहा मंडळ आहेत. या सहाही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
बोधडी मंडळात सर्वाधिक 101.30 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
किनवट मंडळात 81.30, सिंदगी मंडळात 69.80, इस्लापूर 66.80, शिवणी 65.80 आणि जलधारा मंडळामध्ये 65.30 मिमी पाऊस झाला आहे.