Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded : पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी लागणाऱ्या मतपेट्या कचराकुंडीत; नांदेड जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार
पदवीधर मतदानासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कचराकुंडीतून मतपेट्या काढणे सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळं जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या गोदामात अडगळीत पडलेल्या मतपेट्या आढळून आल्या आहेत.
यावेळी तहसील कर्मचारी व खाजगी इसमांकडून मतपेट्या बाहेर काढताना दिसून आले.
सदर गोदाम हे शासकीय असून या गोदामाचे शटर हे मोडलेल्या अवस्थेत आहे.
दरम्यान ह्या मतपेट्यांच्या सुरक्षेची व देखभालीची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असताना सदर मतपेट्या मात्र मुतारीची जागा असणाऱ्या गलिच्छ व अडगळीच्या जागी ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवल्या जातात ती जागा शासकीय नियमानुसार सील करून कुलपबंद ठिकाणी ठेवण्यात येते.
मात्र नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर गोदामाचे सील व शटर हे तुटलेल्या अवस्थेत आहे.
आता पदवीधर निवडणुकांच्या तोंडावर ह्या पेट्या मतदानासाठी काढण्यात येत असल्याची माहिती नांदेड तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय .
त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ व भोंगळ कारभार समोर आलाय.