Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sahastrakund Waterfall : सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून, पाहा फोटो
दरम्यान नांदेडमधील मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पुर आल्याने सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
तर सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिक देखील मोठी गर्दी करत आहे.
मागील तीन-चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आल्याने हा धबधबा ओसंडून वाहत आहे.
तर हे विहंगम दृश्य स्थानिक फोटोग्राफर पवन निमलवाड यांनी आपल्या ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे.
अंदाजे 100 ते 150 फुटावरून सहस्त्रकुंड धबधबा कोसळत असून, या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आहे.
नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या ठिकाणी परिसरातील नागरीक गर्दी करताना दिसतात.
विशेष म्हणजे या व्यंगमदृश्याचा आनंद पर्यटक 80 फुट उंचीच्या मनोऱ्यावरून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर असल्याने दर्शनासाठी ही भावीक येतात.