Nandgiri Fort: गोदावरीच्या काठावरील नांदेडचा 'नंदगिरी किल्ला' घेतोय आकार; पाहा फोटो
नांदेड शहराचे वैभव जशी गोदावरी नदी आहे, तसेच नंदगिरी किल्लाही आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, नंदगिरी किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने गोदावरी नदीच्या काठावर झाडाझुडपांमध्ये लपलेला हा किल्ला घाणीने व्यापला आहे.
पण असे असतांना या किल्ल्याला पुनर्जिवीत करण्याचे काम कोरोना योद्धा वीर सैनिक ग्रुपच्या पुढाकाराने होत आहे.
प्रत्येक रविवारी किल्ल्यावर सकाळी तीन-चार तास स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनीही सहभाग घेतला आहे.
ऐतिहासिक व धार्मिक इतिहास लाभलेल्या नांदेड शहरात हा एक किल्ला आहे.
या नंदीतटामुळे शहराला नांदेड हे नाव मिळाले, तेथील प्राचीन नंदगिरी किल्ल्याची आज वाईट अवस्था झाली आहे.
जुन्या नांदेडमधील अरब गल्लीतून नंदगिरी किल्ल्याकडे जाता येते. गोदावरी नदीच्या पात्राकडील भव्य तटबंदी आणि सहा बलदंड बुरुज एवढीच किल्ल्याची ओळख आता शिल्लक आहे.
सुभेदारी महालासह एकुलती एक तोफही दुर्लक्षित झाली आहे. त्याला मूर्त रूप देण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव आणि वीर सैनिक ग्रुप करत आहेत.