कृषीभूषण शेतकरी भगवान इंगोलेंनी दाखवला वास्तव, शेतातील पाण्यात उतरुन कर्जमाफीची मागणी
राज्यात गेल्या 8 दिवसांत मुसळधार पाऊस पडत असून मराठवाड्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामध्ये, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.
Continues below advertisement
Nanded farmers appeal flood rain
Continues below advertisement
1/8
राज्यात गेल्या 8 दिवसांत मुसळधार पाऊस पडत असून मराठवाड्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामध्ये, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.
2/8
मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पालकमंत्र्यांनीही भेटी दिल्या, राजकीय नेतेही बांधावर गेले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
3/8
एकीकडे अतिवृष्टीचे नुकसान असताना, दुसरीकडे आता कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत सरकारने जाहीर करावी अशीही मागणी विरोधक करतआहेत.
4/8
नांदेड जिल्ह्यातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतातील पिकं पाण्यातून वाहून गेली आहेत, तर काही शेतात गुडघाभर पाणी साचल्याने आता शेती करायची कशी असा प्रश्न बळीराजापुढे आहे.
5/8
नांदेडच्या मालेगांवमध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यानंतर इथले कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवान इंगोले यांनी कर्जमाफी द्या म्हणत सरकारचे लक्ष वेधले आहे.
Continues below advertisement
6/8
शेतात साचलेल्या पुराच्या पाण्यात बसून त्यांनी व्हिडिओ बनवला आहे, त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
7/8
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मणार धरण परिसरातील बहाद्दरपुरा, शेकापूर, घोडज पूरबाधित नागरिकांशी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.
8/8
नांदेडमध्ये गोदावरी नदीवरील प्रकल्पाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नदीला महापूर आला आहे, व विष्णूपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडल्यामुळे आणि सकाळपासूनच पाऊस चालू असल्याने नांदेड शहरातील सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले
Published at : 27 Sep 2025 08:44 PM (IST)