माळेगाव यात्रेत दूषित पाण्यामुळं घोड्याचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत दुषित पाणी पिल्यामुळं एका घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं पशुपालक चिंतेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातील माळेगावची श्री खंडेरायाची यात्रा ही प्रसिद्ध असते. दरवर्षी या यात्रेत घोड्यांचा बाजार भरतो. मात्र, यावर्षी योग्य नियोजन नसल्याचे मत पशुपालकांनी व्यक्त केले आहे.
या यात्रेत दूषित पाण्याचा (contaminated water) प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुषित पाण्यामुळं माळेगाव यात्रेत एका घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळं या घोड्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.
माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा आहे. श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान माळेगाव हे घोड्याचे माळेगाव म्हणून देशभरात सुपरिचित आहे.
यावर्षी माळेगांव यात्रेत घोड्याची वाताहात होत आहे. या यात्रेत दोन वर्षांच्या मारवाडी घोड्याचा दूषित पाणी पिल्यामुळं पोट फुगून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घोड्याचा मृत्यू हा नांदेड जिल्हा परिषद ढिसाळ कारभारामुळं झाल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.
दोन वर्षांच्या मारवाडी घोड्याचा दूषित पाणी पिल्यामुळं पोट फुगून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पशुपालकांमध्ये चिंतेचं वाचावरण पसरलं आहे.
दक्षिण भारतात घोडे व्यापारासाठी सारंगखेडानंतर माळेगाव प्रसिद्ध आहे. घोड्यांच्या व्यापारासाठी अनेक राज्यातून किंमतीचे जातीवंत घोडे व्यापारी इथे घेऊन येतात.
माळेगांव यात्रेत घोडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तर काही शौकीन हौशी घराण्याची परंपरा म्हणून घोडा पाळतात.
सद्या माळेगाव यात्रेत घोडे, उंट दाखल झाले आहेत. या यात्रेत कोणत्याही प्रकारची सोई सुविधा नसल्यानं घोडे व्यापारासाठी आलेले अश्वपालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.