Nanded Accident: ट्रॅक्टर ट्रॉलीसह 8 जण विहिरीत पडले, बचावकार्य सुरु; नांदेडमधील धक्कादायक घटना

Nanded Accident: नांदेडच्या आलेगांव शिवारा येथे ट्रॅक्टर ट्रॉलीसह 8 जण विहिरीत पडल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

Nanded Accident

Continues below advertisement
1/6
हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे.
2/6
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमध्ये होत्या.
3/6
ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले आहे.
4/6
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिला सह एका पुरुषाला वाचवले आहे. मात्र अद्याप ही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
5/6
धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे.
Continues below advertisement
6/6
ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
Sponsored Links by Taboola