Weather Update : राज्यात पुढील चार ते पाच दिवसात उष्णतेची लाट अन् पावसाचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

Weather Alert : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात मिश्र स्वरुपाच्या तीव्र हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

चार ते पाच दिवसातील हवामानाचा अंदाज जाहीर

Continues below advertisement
1/5
भारतीय हवामान विभागाच्यावतीनं चार ते पाच दिवसांसाठीचा अंदाज जारी करण्यात आला आहे. त्यानुसार या कालावधीत मिश्र प्रकारचे तीव्र हवामान राहण्याची शक्यता आहे.
2/5
हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4,5 दिवसांत मिश्र प्रकारचे तीव्र हवामानची शक्यता आहे.
3/5
विदर्भात 27 आणि 28 एप्रिलला गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 25 एप्रिलला अकोला आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
4/5
आगामी चार ते पाच दिवसात मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात उष्ण दमट परिस्थिती व गडगडाटासह पाऊस शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 25 एप्रिलला दक्षिण कोकणात गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
5/5
विदर्भात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांना 27 एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. तर, विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. 28 एप्रिल भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातील इतर जिल्ह्यांना आणि मराठवाडा अन् दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola