Vasai Rangoli Competition : वसईतील जूचंद्र गावात रंगले रांगोळी प्रदर्शन; विविध कलाकारांच्या प्रतिमांची हुबेहूब साकारली रांगोळी

Vasai Rangoli Competition : वसईतील जूचंद्र येथे रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या ठिकाणी विविध रांगोळी पाहायला मिळत आहेत.

Vasai Rangoli Competition

1/9
वसई तालुक्यातील जूचंद्र गाव हे रांगोळी कलाकारांचे गाव आहे. येथील रांगोळी कलाकारांनी आपल्या गावाची ओळख राज्यातच नव्हे तर देश-परदेशात ही निर्माण केली आहे.
2/9
याच रांगोळी कलाकारांच्या जूचंद्र गावात 30 ऑक्टोबर पर्यंत रांगोळी प्रदर्शन भरलं आहे.
3/9
शिवछत्रपती समाजसेवा मंडळ जूचंद्र यांच्या पुढाकारातून मागच्या 35 वर्षांपासून या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केलं जातं.
4/9
राज्याच्या सत्ताकारणात केंद्रबिंदू असलेले धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांना एकाच रांगोळीत चित्रीत करून, एका बाजूने आनंद दिघे तर दुसऱ्या बाजूने बाळासाहेब ठाकरे यांना दाखवून दिघे ठाकरे यांना एकजीव दाखविण्याचा प्रयत्न रांगोळी कलाकारांनी केला आहे.
5/9
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची रांगोळी प्रत्येकाच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
6/9
या प्रदर्शनात पोट्रेट, थ्रीडी, पाण्याखालाची रांगोळी, यासह अन्य रांगोळी काढण्यात आल्या आहेत. या रांगोळी प्रदर्शनात अनेक सामाजिक संदेश दिले जात आहे.
7/9
रंगांच्या विविध छटा भरून, हुबेहूब प्रत्येक कलाकारांचे चित्र जूचंद्र गावाच्या कलाकारांनी काढले आहे.
8/9
या रांगोळी स्पर्धेत प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढत गेली.
9/9
या कलाकारांचे हसरे चेहरे पाहून प्रत्यक्ष ही रांगोळी साकारणाऱ्या कलाकाराच्या कौशल्याची काही तोड नाही.
Sponsored Links by Taboola