PHOTO : 2 हजार 51 वह्यांनी साकारले 'सिम्बॉल ऑफ नॉलेज', डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना
कल्याण पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि बासरीवाला आधुनिक ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने 2 हजार 51 वह्यांचा वापर करुन सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या प्रतिकृतीच्या माध्यमातून एक आगळी वेगळी मानवंदना देण्यात आली आहे.
कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयाच्या शेजारी जयंती महोत्सव गेल्या तीन दिवसापासून साजरा केला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच ठिकाणी 660 चौरस फुटांच्या जागेवर 2 हजार 51 वह्यांचा वापर करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. रुपेश गायकवाड आणि रोहन जगताप यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकरण्यात आली आहे.
या मंडळींनी शिवजयंतीच्या दिवशी पाच हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून महाराजांची प्रतिमा साकारली होती.
त्या पाठोपाठ घटनेच्या शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती उभारली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.