PHOTO : BMC कडून मुंबईकरांसाठी उद्यान प्रदर्शनाचं आयोजन; खास फुलं, फळं आणि वनस्पतींची झलक
बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी फुले, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवते ज्याची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत असतात. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबागकाम प्रेमींसाठी हॉटस्पॉट असलेले हे प्रदर्शन पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
सध्या G20 शिखर परिषद चर्चा आहे म्हणूनच, BMCच्या वृक्ष प्राधिकरणाने प्रदर्शनाची थीम ही G20 ठेवली आहे. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
भायखळा पूर्व इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
या उद्यान प्रदर्शनाचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आला. (PHOTO : @mybmc Twitter)
या प्रदर्शनाचा उद्देश मुलांना विविध वनस्पती, झाडे, फुले आणि फळांविषयी माहिती देणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे, असं बीएमसीचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी ही फुले कार्टून कॅरेक्टरच्या आकारात साकारण्यात आली आहेत. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
काही मनोरंजक दृश्यांचा आनंद घेताना त्यांना वनस्पतींबद्दल शिक्षित करणं हा या उद्यान प्रदर्शनाचा हेतू आहे, अशं जितेंद्र परदेशी म्हणाले. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)
हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही. मागील वर्षी या प्रदर्शनला दीड लाख पर्यटकांनी भेट दिली होती. (PHOTO : @AshwiniBhide Twitter)