PHOTO: बाळासाहेब नावाच्या वादळाचा अंत...17 नोव्हेंबर 2012 हा दिवस मुंबईसाठी कसा होता?
आजच्याच दिवशी दहा वर्षांपूर्वी बाळासाहेब नावाचं वादळ शमलं होतं. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनीटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाळासाहेबांचे अंतिम दर्शन घ्यायला अवघा महाराष्ट्र लोटला होता. मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती. शिवसैनिकांसह सामान्य माणून रस्त्यावर उतरला होता.
बाळासाहेब ठाकरे हे अनेक दिवसांपासून आजारामुळे अंथरुणाला खिळून होते. 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले.
बाळासाहेबांचे पार्थिव मातोश्री या त्यांच्या निवासस्थानावरुन एका सजवलेल्या ट्रकमधून शिवाजी पार्क या ठिकाणी नेण्यात आलं.
या ट्रकमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे होत्या. राज ठाकरे हे स्वत: ट्रकच्या मागून लोकांमधून चालत होते.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.
त्या ठिकाणी बाळासाहेबांचा मोठा मुलगा जयदेव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते.
बाळासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी तत्कालीन भाजप नेत्या सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मुंबई पोलिसांच्या वतीनं बाळासाहेबांना 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
बाळासाहेबांच्या जाण्याने मुंबईतील मराठी माणसाचं आणि शिवसेनेचं आतोनात नुकसान झालं.