PHOTO : गद्दार सदा सरवणकर, आक्रमक शिवसैनिकांनी फोटोला काळं फासलं
शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादर-माहिम मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर यांचा गद्दार असा उल्लेख करत शिवसैनिकांनी त्यांच्या बॅनरला काळं फासलं.
शिवसेनेची माहिममधील शाखा क्रमांक 188 बाहेर मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या फोटोला काळं फासून गद्दार असा उल्लेख केला.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे.
शिवसेनेचे आणखी सात आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत.
मुंबईतील शिवसेना आमदार कट्टर असून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत असा विश्वास होता. परंतु मुंबईतील तीन आमदार आज गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि या विश्वासाला तडा गेला.