PHOTO : सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील मोठी आहे. साराला आतापर्यंत वेस्टर्न लूकमध्ये पाहिलं असेल. परंतु नुकताच तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला (PHOTO : Instagram @saratendulkar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन तेंडुलकरने कुटुंबासह एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी सारा तेंडुलकर पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशात दिसली. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने आणि हातात लाल बांगड्या घातल्या होत्या. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
या लग्नात साराने निळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यात तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
या लग्नसोहळ्यातील नंतरच्या इतर कार्यक्रमात साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
लग्नाला सचिन तेंडुलकरची आई देखील हजर होती. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)
सचिन तेंडुलकर नववधूवरांना शुभेच्छा दिल्या. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. (PHOTO : Sameer Vasaikar Facebook)