Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mumbai Rain News: भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या पश्चिम उपनगर, ठाण्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते तीन फूट पाणी भरल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement
Mumbai Rain News
Continues below advertisement
1/6
मुंबई, ठाण्यासह पश्चिम उपनगरात आज सकाळपासून धो-धो पावसाच्या सारी बरसात आहेत. मुंबईत सध्या सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रुज विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
2/6
सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सखलभागात ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.
3/6
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळ पासून सुरु असलेल्या पावसाच्या दमदार सरीमुळे ठाण्यासह अंधेरी सबवेमध्ये सध्या दोन ते तीन फूट पाणी भरल्याचे चित्र आहे. यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
4/6
तर दुसरीकडे पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी देखील आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अशातच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरला आहे. त्यासोबत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर देखील सखल भागात पाणी भरलं आहे. एकूणच या पावसामुळे सकाळी कामानिमित्य बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
5/6
पुढे आलेल्या माहितीनुसार, मुंबई पूर्व उपनगरात ही सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकातून ये जा करणाऱ्या चाकरमण्याना यामुळे दोन ते तीन फूट पाण्यातून प्रवास करावा लागतो आहे.
Continues below advertisement
6/6
मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी तो तात्पुरता बंद करण्यात आला होता.
Published at : 21 Jul 2025 09:12 AM (IST)