PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीकेसीतील मैदानातील सभेसाठी जय्यत तयारी, बीकेसी मैदानावर भव्य रांगोळी
मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (सर्व फोटो क्रेडिट - रांगोळी कलाकार सानिका पाटकर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रदान मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
मोदींच्या सभेसाठी बीकेसी मैदानावर रांगोळी काढण्यात आली आहे.
50 फूट रुंद आणि 16 फूट उंच रांगोळी बीकेसी मैदानात काढण्यात आली आहे.
अकरा जणांच्या टीमने रात्री 1 वाजल्यापासून रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती
तब्बल नऊ तासानंतर ही रांगोळी पूर्ण झाली आहे.रांगोळी कलाकार सानिका पाटकर यांनी रांगोळी साकारली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बीकेसीतल्या सभास्थळीही चोख सुरक्षा व्यवस्था आहे
बीकेसी मैदानात तीन व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. त्यात मुख्य स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते असतील.
दुसऱ्या स्टेजवर अवधूत गुप्ते यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर तिसऱ्या स्टेजवर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज मोदींची सभा पार पडणार आहे.
यावेळी मोदी काय भाषण करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय..