Mumbaicha Raja Visarjan 2025 : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी.... मुंबईचा राजा गणेश गल्लीतून निघाला; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, गर्दीचा महासागर
Mumbai Ganesh Visarjan Update : आज अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे.
Mumbaicha Raja Visarjan 2025 Update
1/7
आज अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे.
2/7
या उत्सवाच्या पारंपरिक जल्लोषात आणि भक्तिभावात मुंबईतील गणेशगल्लीचा "मुंबईचा राजा" देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
3/7
गणेश गल्लीतील राजाची सकाळी आरती पार पडली असून त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
4/7
ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी संपूर्ण गल्ली दुमदुमली आहे.
5/7
भक्तांच्या गर्दीत श्रद्धा, भावना आणि उत्साहाचा महापूर ओसंडून वाहत आहे.
6/7
मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन मात्र सकाळी 10 वाजता होणार आहे.
7/7
त्यामुळे आजचा दिवस भावनांचा, भक्तीचा आणि उत्सवाच्या निरोपाचा सोहळा ठरणार आहे.
Published at : 06 Sep 2025 08:39 AM (IST)