Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; पार्किंगमध्ये गाड्या उभ्या असल्यासारख्या रस्त्यांवर रांगा, लोकलवरही परिणाम

Mumbai Rains: मुंबईत आणखी तीन दिवस मुसळधार तुफान पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसामुळे आता रेल्वेलह रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

Mumbai Rains

1/9
Mumbai Rains: मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
2/9
आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय. यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
3/9
मुंबईतील पावसाचा आता रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4/9
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.
5/9
एखाद्या कार पार्किंगमध्ये ज्या पद्धतीने गाड्या उभ्या असतात, तसे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांच्या रांगा दिसत आहे.
6/9
कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे.
7/9
किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे. मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे.
8/9
पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
9/9
सध्या मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वे (Harbour Railway) पाच मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वेची (Western Railway) सुरळीत सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम होऊ शकतो.
Sponsored Links by Taboola