Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS

Mumbai Rain Updates : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून मंत्रालयाबाहेर पाणीच पाणी साचल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement

Mumbai Rain Updates

Continues below advertisement
1/10
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
2/10
आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने मुंबईत सकाळी 10 वाजले तरी अंधार पाहायला मिळत आहे.
3/10
मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
4/10
मंत्रालय परिसरात देखील पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
5/10
यामुळे मंत्रालय परिसरात आलेल्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
Continues below advertisement
6/10
गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना मंत्रालय परिसरातून जावे लागत आहे.
7/10
दरम्यान, किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात देखील रस्त्यावर पाणी साचले आहे.
8/10
चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
9/10
तर पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
10/10
मुंबईतील जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
Sponsored Links by Taboola