Mumbai Rain : काळा-काळा कापूस पिंजला रे... मायानगरीवर काळ्याकुट्ट ढगांची दाटी...
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह आसपासच्या परिसरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
या पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम सक्रीयपणे संपूर्ण महानगरात कार्यरत आहे.
मलवाहिनी किंवा पर्जन्य जलनिःसारण वाहिनीवरील झाकण उघडल्याने नागरिकांना गंभीर अपघाताची शक्यता असते, त्यामुळे प्रवेशिकांचे झाकण (मॅनहोल) उघडू नये, असे आवाहन पालिकेनं केलं आहे.
मुंबईमध्ये मागील तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी, विले पार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.