Mumbai News: विधानभवनाच्या बाहेर तरूणाचं झाडावरती चढून आंदोलन, खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू, काय आहे त्याची मागणी?

Mumbai News: या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा या परिसरात दाखल झाला. विधानभवन परिसरामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे.

Mumbai News

1/7
विधान भवनाच्या बाहेर असलेल्या झाडावरती चढून एका तरुणाने आंदोलन सुरू केलं आहे. सेंद्रीय माॅलची संकल्पना असल्याचा बॅनर हातात घेऊन तो झाडावरती आंदोलन करत आहे.
2/7
या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा या परिसरात दाखल झाला. विधानभवन परिसरामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे.
3/7
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अशातच एका तरूणाचे या परिसरात असलेल्या झाडावर चढून आंदोलन सुरू आहे. फायर ब्रिगेडचे जवान या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
4/7
या तरुणाला खाली उतरवण्यासाठी मोठी सिडी लावण्यात आली आहे. विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या मोठ्या झाडावरती चढून तरूणाने आंदोलन सुरू केलं आहे.
5/7
सेंद्रीय शेतीची मागणी तो करत आहे. त्या तरूणाच्या हातामध्ये तिरंगा देखील आहे. सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेचं बॅनर त्याच्या हातामध्ये आहे.
6/7
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे, गेली वीस ते पंचवीस मिनीटांपासून त्याचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
7/7
या तरुणाने झाडावर चढून आता आंदोलन करत असताना स्वतःचं रील तयार करुन युट्युब ला अपलोड केले आहे. पोलिस झाडावर चढून आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत.
Sponsored Links by Taboola