Mumbai Metro-3 : मुंबई मेट्रो-३ च्या चाचणीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा!
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३च्या चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला.
metro
1/10
मुंबईतील सार्वजनिक वाहकतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आजपासून सुरू झाला आहे.
2/10
आज मेट्रो 3 च्या (Metro 3 Trial) चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Elnath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रो 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला.
3/10
मुंबई-3 मेट्रोचा मार्ग भुयारी असणार आहे. त्यामुळे या मेट्रोच्या चाचणीला मोठे महत्त्व आहे. ही चाचणी आरेतील सारिपूतनगर ते मरोळ नाका दरम्यानच्या तीन किमीच्या अंतरादरम्यान होणार आहे.
4/10
मुंबई मेट्रोमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार असून वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
5/10
मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. मेट्रो 3 ही मुंबईची नवीन लाईफलाईन असणार आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
6/10
मेट्रो लाईन 3 ही कुलाबा - वांद्रे - सिप्झ अशी असणार आहे. सारीपूतनगर येथील ट्रॅकवर या चाचणीला सुरुवात झाली आहे.
7/10
उद्या विघ्नहर्त्याचे आगमन होत असून त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे (Mumbai Metro) वातावरणातील प्रदूषण कमी होईलच त्याशिवाय राजकीय प्रदूषणही कमी होणार असल्याचे म्हणत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेला टोला लगावला.
8/10
या प्रकल्पामुळे आता राजकीय प्रदूषणही बंद होईल असे त्यांनी म्हटले.
9/10
मेट्रो 3 च्य ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. ही ट्रोन प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का याचा विचार होणार आहे.
10/10
मेट्रो-3 ची चाचणी ही भूमिगत चाचणी होणार आहे. मेट्रो-3 चा मार्ग भूमिगत असणार आहे.
Published at : 30 Aug 2022 05:05 PM (IST)