Mumbai Local Train Updates: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'लोकल'वर परिणाम, जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स

Mumbai Local Train Updates: मुंबईत सकाळी 7.30 पर्यंतच्या 21 तासांत 71.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या उपनगरांत 17.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Local Train Upates

1/6
Mumbai Local Train Updates: राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने (Mumbai Rain Updates) धडाकेबाज एन्ट्री कर एकच दाणादाण उडवली आहे.
2/6
मध्य रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
3/6
पुढील 3 तासांत मुंबई आणि उपनगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. यासह पुढील 3 तासांत 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
4/6
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने येणारी जलद वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे.
5/6
पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 7-8 मिनिटं उशिराने सुरू आहे.
6/6
मुंबईत सकाळी 7.30 पर्यंतच्या 21 तासांत 71.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या उपनगरांत 17.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सायनमध्ये 43 मिमी, तर मुंबई विमानतळ भागात 33 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Sponsored Links by Taboola