Mumbai Local Megablock: आधी प्रवासाचं नियोजन करा, मगच घराबाहेर पडा; मुंबई लोकलच्या 'या' दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock News: मुंबई : रविवारी (Sunday) सुट्टीच्या दिवशी घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा सर्वात आधी मुंबई लोकलचं (Mumbai Local) वेळापत्रक तपासून पाहा. रविवारी (29 ऑक्टोबर 2023) मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम रेल्वेनं (Western Railway) वसई रोड ते विरार (Vasai Road to Virar) स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे.
रविवारी ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गांवरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर येत्या रविवारी कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही.
रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेसह इतर काम करण्यासाठी मध्य रेल्वेमधील ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे - वाशी / नेरूळदरम्यान मध्यरेल्वेनं रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
पश्चिम रेल्वेनं वसई रोड - विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे. तर, मध्यरेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.
ट्रान्सहार्बर मार्ग कुठे : ठाणे - वाशी/नेरूळ अप आणि डाऊन कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 परिणाम : ब्लॉक वेळेत ठाणे - वाशी / नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेमार्ग कुठे : वसई रोड - विरार अप आणि डाऊन धीमा मार्ग कधी : शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी ते रविवारी पहाटे 4 पर्यंत परिणाम : ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील.
मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.